बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान रमेश शामराव सुरुशे (वय 45) या अज्ञात इसमाचा 18 जुलै रोजी मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्याला कोणताही नातेवाईक, मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती भेटीला आलेला नव्हता. त्यामुळे त्याचा मृतदेह सध्या बेवारस स्थितीत असून पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरु आहे.रमेश याला 16 जुलै रोजी प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाची उंची 5.5 फूट, अंगकाठी सडपातळ, काळी दाढी, अंगावर शासकीय रुग्णालयाचा निळा ड्रेस होता.
कोणालाही या इसमाची माहिती असल्यास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क – HC नरेंद्र रोठे (मो. 9623243733) आणि MC विश्वास हिवाळे (मो. 8308578721)