चिखली (हॅलो बुलडाणा) विद्युत मीटर तपासण्याच्या नावाखाली भर दुपारी घरी जाऊन सैनिकाच्या पत्नीशी वाईट उद्देशाने लगट करणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकामधील एका अभियंत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आशिष देशमुख रा.महावितरण विद्युत कंपनी, भरारी पथक बुलढाणा, असे आरोपीचे नाव असून ही घटना चिखलीतील श्रीकृष्ण नगरात समोर आली.
महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.जिल्ह्यात अनेक संतप्त आणि धक्कादायक घटना घडत आहे.अशात चिखली येथे 18 जुलैला श्रीकृष्ण नगरात महावितरणच्या भरारी पथकामधील आशिष देशमुख हा अडीच वाजताच्या सुमारास पीडिताच्या घरी अनाधिकृतपणे घुसला आणि वाईट उद्देशाने पिडीतेला त्याने ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला.’माझा पर्सनल नंबर घे आणि माझ्या संपर्कात रहा’ असाही आरोपी म्हणाला. दरम्यान पिडीतेने विरोध दर्शविला असता,आरोपी आशिष ने दमदाटी केली, अशी तक्रार पोलिसात दिल्यावरून पोलिसांनी अप नं.554/25 कलम333,78(2),351(2) बिएनएस प्रमाणे पुन्हा दाखल केला आहे.तक्रारकर्त्या महिलेचा पती सध्या जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे.