बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांसाठी बलिदान देणारे युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त स्व.कैलास नागरे यांची न्यायिक बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने वेळोवेळी लावून धरली मात्र ढिम्म सरकारने नागरे कुटुंबीयांना अद्यापही न्याय न दिल्याने आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यवस्थेनच कैलास नागरे यांचा बळी घेतला असा आरोप करून,शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळावा,अशी मागणी विधिमंडळात केली आहे.
खडक पुन्हा प्रकल्पातून शिवनी आरमाळ परिसरातील छोट्या धरणांमध्ये पाणी सोडले जावे,कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अनेक निवेदने साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्षवेधणारे युवा शेतकरी कैलास अर्जुनराव नागरे (44) यांनी 13 मार्चला होळीच्या दिवशी शेतात सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. दरम्यान काही नेतेमंडळी यांनी त्यांचे घर गाटून धीर दिला आणि आश्वासनांची खैरात केली होती.प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते.याचे आदेश निघाले नाहीत.एका बोटचेप्या पोर्टल न्यूजने पीए विद्याधर महाले यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनीच प्रस्ताव पाठविला नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या विषयी सकारात्मक बातमी टाकून गवगवा केला. प्रत्यक्षात नागरे कुटुंबीयांना दोन आपत्य आहेत. मुलगी अभियंत्रीत शिक्षण घेते तर मुलगा इयत्ता नववी मध्ये शिकत असून शैक्षणिक सत्र उलटले तरी,मुख्यमंत्र्यांची अजूनही कुठली मदत मिळाली नाही.स्वाती नागरे यांना कुठली नोकरी दिलेली नाही.त्यामुळे नागरिक कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी,आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात केली.