spot_img
spot_img

सागाच्या बल्ल्या तोडून शेती बॉर्डरवर ठोकल्या! – डोंगरखंडाळाच्या शेतकऱ्यावर वनगून्हा दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पळसखेड नागो बीट, कक्ष क्रमांक 338 मधून सागाच्या बल्ल्या तोडून आणून त्या शेतीच्या बॉर्डर वरती ठोकून फेन्सिंग करणाऱ्या एका इसमावर आज 16 जुलै रोजी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तपुर शिवारांमधील गट 55 मध्ये शेतकरी आकाश प्रमोद जाधव वय 23 वर्ष रा. डोंगर खंडाळा याने पळसखेड नागो बीट, कक्ष क्रमांक 338 मधून सागाच्या बल्ल्या तोडून आणून शेतीच्या बॉर्डर वरती ठोकून फेन्सिंग केली असल्याची गुप्त तक्रार प्राप्त झाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे अभिजीत ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप मुंढे वनपाल अतिरिक्त कार्यभार पाडळी वर्तुळ, श्रीमती मीरा बोरकर वनरक्षक पळसखेड नागो, विक्रम राऊत वनरक्षक गिरडा 2, वनमजूर रवींद्र तायडे, वनमजूर दीपक सोनूने, वनमजूर अरुण पंडित या वन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर ठिकाणी शेतकऱ्याच्या शेती बॉर्डरला लागलेल्या सागाच्या एकूण 26,250 रुपये किमतीच्या 105 बल्ल्या आढळून आल्या. हा मुद्देमाल जप्त करून लाकूड आगार बुलढाणा या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला आहे.सदर आरोपीवर वन गुन्हा नोंदविण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!