spot_img
spot_img

अखेर तो वाघ अकोलाच्या पिंजऱ्यात! – वाळू तस्कर एक वर्षासाठी स्थानबद्ध! – इतरही वाळू तस्कर प्रशासनाच्या निशान्यावर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात वाळू तस्करांनी चांगलेच डोके वर काढले आहे. मात्र या वाळू तस्करांच्या नांग्या ठेचण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतले आहे. त्यामुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे.
पो.स्टे. अंढेरा येथील वाळु तस्कराला एम. पी. डी. ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले.मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ, वय ३५ वर्ष, रा. डिग्रस ता.देउळगांव राजा जि. बुलढाणा असे स्थानबद्ध केलेले आरोपीचे नाव आहे.

या आरोपीवर यापुर्वी अवैधरीत्या वाळु चोरी करुन वाहतुक करणे, शासकीय कर्मचारी यांचेवर हल्ला करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे व इतर असे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्यांचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा कायदयास काही जुमानत नसल्याने त्यांचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन त्याचे गुन्हेगारी कृत्यांला आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी त्यांस स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने त्यांस एक
वर्षाकरीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश एक जुलै रोजी
पारीत केला. विदर्भातील पहीली वाळु तस्करांवर केलेली कार्यवाही असुन सदरबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे वाळु माफीयांचे कर्दनकाळ बनलेले आहेत. जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांचे आदेशावरून मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ याचा तात्काळ शोध घेवुन त्यांस सदरचा आदेश तामील करून त्यांस दिनांक दोन जुलै रोजी जिल्हा कारागृह अकोला येथे स्थानबध्द केले. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक, श्री. सुनील कडासने यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री. अशोक लांडे, पो.ना. संजय भुजबळ यांनी तसेच पो.स्टे. अंढेरा येथील सहायक पोलीस निरीक्षक श्री. विकास पाटील, पोकॉ. गोरखनाथ राठोड यांनी परिश्रम घेतले. बुलढाणा जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन वाळु तस्करी करणारे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत वाळु तस्कर आरोपींची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द एम. पी. डी. ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!