अंढेरा (हॅलो बुलडाणा) ग्रामीण भागात अवैध देशी दारू धडाक्यात विकल्या जात असून एलसीबीच्या पथकाने अंढेरा पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम दिग्रस व सरंबा फाटा येथे 2 आरोपींवर 14 जुलैला कारवाई करत 8 हजार 960 रुपये किमतीच्या दारूसह एक मोटार सायकल असा एकुण 58 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे
अंढेरा पोलीसांचे अवैध दारू विक्रीवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्री धडाक्यात सुरू आहे.मूळ किमतीपेक्षा दुप्पट भावात ही दारू विकून अवैध दारू विक्रेते मालामाल होत आहेत. दारूची व्यसनाधीनता वाढली असून गोरगरीबांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे.यातूनच गुन्हेगारीला वाट मोकळी होत असून,प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होतोय. मात्र अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत असे अवैध धंदे सुरू असून, या धंद्यांना अंढेरा पोलीसांचा आर्शिवाद असल्याचे दिसून येत आहे.मात्र
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अवैध धंद्यांवर आसूड ओढत कारवाईचा धडाका लावला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यवाहीसाठी सक्रिय झाले आहे. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम दिग्रस व सरंबा फाटा येथे 2 आरोपींवर 14 जुलैला कारवाई करत 8 हजार 960 रुपये किमतीच्या दारूसह एक मोटार सायकल असा एकुण 58 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईत देशी दारू सखू संत्रा 180 एमएलच्या 64 बॉटल तर 90 एमएलच्या 100 बॉटल अशी एकूण 8 हजार 960 रुपयांच्या दारूसह एक मोटरसायकल असा एकुण 58 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्तीची कार्यवाही एपीआय संजय मातोंडकर, एएसआय ओम प्रकाश सावळे, वनिता शिंगणे, मंगेश सनगाळे, दीपक वायाळ या पथकाने केली आहे.