अमडापूर (हॅलो बुलडाणा) नायगाव खुर्द शिवारातील टाकळी धरणाच्या पाण्यात आढळून आलेल्या महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून अनैतिक संबंधातून दीराने केल्याचे समोर आले आहे. मधुकर शामराव गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्याने तिचा दोरीने गळा आवळून धरणात फेकून दिल्याचे उघड झाले आहे.
अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम नायगाव खुर्द येथील किशोर शामराव गायकवाड यांची पत्नी आशा गायकवाड 29 जून रोजी शेतातून घरी जाण्यास निघाली असताना ती घरी पोहोचली नाही. याबाबत पतीने पोलीस ठाण्यात मिसींग दाखल केली. दरम्यान या महिलेचा मृतदेह नायगाव खूर्दशिवारातील पेनटाकळी धरणात आढळून आला.मृतक महीलेच्या भावाने पती,सासरा, सासू व दीर हे महिलेला माहेर वरून तीस हजार रुपये आणण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार दिल्याने सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपास सुरू असताना गुन्ह्यातील आरोपी मृत महिलेचा दीर मधुकर शामराव गायकवाड याने कबूली दिली की, मृत महिलेशी 3 वर्षा पासून प्रेम संबंध होते. सदर महिला वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती.दरम्यान महिलेला कुंकू लावून लग्नाचा बनाव केला होता.महिलेच्या सततच्या पैशाची मागणी वाढत चालली असल्याने आरोपी मधुकर त्रासून गेला होता.दरम्यान महिलेचा काटा काढण्याचे त्याने ठरविले.29 जून रोजी सदर महिला शेतातून घरी जात असताना आरोपी मधुकर तिला गाठून पेनटाकळी धरणाजवळ आला.धरणाच्या पाण्याच्या जवळील एका दगडावर आरोपी मधूकर याने महिलेचा दोरीने गळा वळून तिला धरणाच्या पाण्यात फेकून दिले.या खुणा याप्रकरणी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.