देऊळघाट (हॅलो बुलडाणा) उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करून देऊळघाटचे माजी सरपंच बबलूसेठ यांच्यासह अनेकांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे.
ठाकरे ब्रँडला बुलढाण्यात मोठी पसंती मिळत आहे.त्यामुळे अनेक एकनिष्ठ शिवसैनिक उबाठा गटात प्रवेश करीत आहेत. दरम्यान बुलढाणा विधानसभेतील माजी पं.स. सभापती,माजी ग्रामपंचायत सरपंच तथा माजी बाजार समिती संचालक यांच्या सह अनेक जणांनी मातोश्री मुंबई येथे आज १४ जुलै रोजी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून शिवबंधन बांधले आहे. यावेळी आ. सिद्धार्थ खरात, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, डि.एस. लहाने,लखन गाडेकर उपस्थित होते.