spot_img
spot_img

💥BREAKING गुटख्याची मोठी खेप जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) बुलढाणा जिल्ह्यात गुटखा माफियांना चाप बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिखली-बुलढाणा रोडवर अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या गुटख्याची मोठी खेप जप्त केली आहे. ही कारवाई आज सोमवारी रात्री ७.३० च्या सुमारास करण्यात आली.MP09 GJ1547 या आयशेअर गाडीत संपूर्ण गाडी गुटख्याने भरलेली होती. गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गाडी थांबवून तपासणी केली असता गुटख्याचे अनेक बॉक्स आढळून आले.

या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे. पकडलेला संपूर्ण मुद्देमाल चिखली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा व वाहतूक सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आता या मागे असलेल्या मोठ्या रॅकेटचा छडा लावण्याचे आव्हान पोलीस विभागासमोर आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!