spot_img
spot_img

सौजन्याची वागणूक कसली? बसवाहकाचा उर्मटपणाच! – मलकापूर डेपो मधील वाहकाची प्रवाश्यासोबत अरेरावी! – बुलढाणा आगारात प्रवाशांची वाहक विरोधात लेखी तक्रार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आधीच राज्यातील एसटी महामंडळाची दुरावस्था झाली असून,भंगार बसेस,चालक वाहकांची प्रवाशांशी उर्मट वागणूक, अपुऱ्या बसेस फेऱ्या या व इतर बाबीमुळे एसटी नेहमी चर्चेत असते.बुलढाणा जिल्ह्यात सात आगार आहेत. या आगारात असंख्य चालक वाहक कार्यरत आहे. या स्पर्धेच्या युगात खाजगी बसेस प्रवासी सुरु झाल्याने एसटी मागे पडताना दिसत आहे. अशात एसटी महामंडळाच्या ‘प्रवाश्याशी सौजन्याची वागणूक’ या स्लोगनला हरताळ फासण्याचे काम वाहकाकडून होताना दिसत आहे. तशी लेखी तक्रार बुलढाणा आगारात झाली आहे.

बुलढाणा आगारात मलकापूर ते छत्रपती संभाजी नगर ही बस लागलेली होती ती बस पकडण्यासाठी काही प्रवासी बस स्थानकावर उभे होते. काही जण बस मध्ये जागा पकडण्यासाठी गेले होते. बसच्या चालकाने बस मागे घेतली तेव्हा एका प्रवश्याने वाहकाला विनंती केली की दोन महिला प्रवासी बसच्या मागे धावतायेत थोडे थांबा.. तर यावर बस वाहक चिडले व त्यांनी प्रवाश्याला उद्धटपणाची वागणूक देत गाडी खाली ढकलून दिले.प्रवश्याने विनंती केली दोन मिनिटे थांबा सर अश्या भाषेत बोलून सुद्धा वाहक बोलले तु खाली उतर वेळ नाही. मागे खुप साऱ्या बसेस आहेत. वास्तविक पाहता बसमध्ये 12 ते 15 प्रवाशीच होते अर्धी बस रिकामीच होती व त्या प्रवाश्याला खाली ढकलून दिले. ‘तु आमच्या साहेबाना जाऊन विचार व जे सांगायचे ते सांग.. असेही ते वाहक बोलले. हे सर्व प्रवासी ऐकत होते. शेवटी त्या दोन महिलांना त्याचं बस मध्ये बसवून दिले. मात्र त्या प्रवश्याने बुलढाणा आगारातील तक्रार वहीत लेखी नोंद करून अश्या वाहकांवर् कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. एसटी महामंडळाने सौजन्याच्या वागणूकीची अमंलबजावणी करावी अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!