बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘आमदार निवासात डाळीचा वास अन् बुलढाण्यात रुग्णांना निकृष्ट दर्जाचा घास!’ या मथळ्याखाली ‘हॅलो बुलढाणा’ ने तत्पूर्वी वृत्त प्रकाशित केले होते.या वृत्तावर आता माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. बुलढाण्यात विविध शासकीय ठिकाणी मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासण्यात यावा व तेथे ठेके कुणाचे आहेत? ठेकेदार कुणाचे चेलेचपाटे आहेत? याच्या चौकशीची मागणी शिंदे यांनी केली आहे.
आम.संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये ऑपरेटरला डाळीचा वास येत असल्याने मारहाण केल्याचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ने बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर आर.एच.मध्ये देखील दर्जेदार जेवण मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.या संदर्भातील वृत्तावर विजयराज शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.शिंदे म्हणाले की, जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय किंवा महिला रुग्णालयसह इतर या ठिकाणी अन्नाचा दर्जा तपासणे अत्यंत गरजेचे आहे.तेथे ठेके कुणाचे आहेत, ते ठेकेदार कुणाचे चेले चपाटे आहेत? पुरविण्यात येत असलेल्या आहाराचे आता पर्यंत खोटी कागदपत्रे देऊन करोडो रुपयांचे बिले काढल्याचा स्फोट करण्यात आला असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विजयराज शिंदे यांनी मिडीया समोर केली. तसेच यासंदर्भात पुढील काळात पत्रपरिषद घेणार असल्याचे सांगितले आहे.
क्रमशः