बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील यशोदा मेडिकल स्टोअर्स मध्ये घुसून 24 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याच्या एलसीबीने 12 जुलै रोजी मुसक्या आवळल्या आहे. फैजान खान नईम खान, रा. इक्बाल नगर,अफसर किराणा जवळ, बुलढाणा असे चोरट्याचे नाव आहे.
बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या कक्षेत येणाऱ्या यशोदा मेडिकल स्टोअर्समध्ये घूसून
आरोपी फैजान खान नईम खान याने 24 हजार रुपये लंपास करून पोबारा केला होता.परंतु ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर हा चोरटा लगेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या 24 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने एपीआय संजय मातोंडकर,हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे,चांद शेख,गणेश पाटील, गजानन गोरले या पथकाने केली आहे.