spot_img
spot_img

बुलढाण्यातून सायकलिस्टची सायकल दिंडी! -पर्यावरणाचा संदेश, पंढरपूर शहरास रिंगण

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यभरातील सायकलिस्ट सायकलवरूनच विठू माऊलीच्या पंढरपूर नगरीला 7 जुलै रोजी रिंगण घालण्यासाठी येथील जयस्तंभ चौकातून रवाना होणार आहेत. आहे.पर्यावरण संतुलन, शारीरिक समृद्धी व पंढरपूरमधील श्री विठ्ठल दर्शन, सायकल नगर प्रदक्षिणा करण्याचा संकल्प पंढरपूर -बुलढाणा सायकल क्लबने केला आहे.

पंढरपूर बुलढाणा सायकल क्लब सायकल वारी 3 जुलै रोजी जयस्तंभ चौक येथून सकाळी 5.30 वाजता पंढरपूरकडे रवाना होणार आहे. 7 जुलैला पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा तसेच सायकल रिंगण असा कार्यक्रम राहील. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक सायकलिस्ट बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. श्री सरदारसिंह ठाकूर,
रा. बुलढाणा, श्री गणेश आत्माराम जाधव,रा. हातनी,श्री सागर परिहार,रा. चिखली, श्री रणजित व्यवहारे,श्री अनिल सुशीर,डॉ. श्री आदित्य जाधव, श्री नंदुभाऊ उमाळे,श्री विष्णुभगवान शंकर गाढे, रा. बुलढाणा,
श्री दीपक क्यावल रा. बुलढाणा, ऍड. श्री अनुप यादव सर, रा. चिखली. श्री गणेश दव्हरे (कॅश) रा.बुलढाणा,श्री कैलास वाणी, श्री विजय पाटील,श्री संजय टाके सर,श्री महेश व्यवहारे,दोन्ही रा. चिखली, श्री संदीप मुंढे,
चि. हर्ष विष्णु गाढे, श्री मधुकर राजपूत, श्री सूरज पवार,ऍड.श्री सुशील भालेराव, श्री संजय बनगाळे रा. बुलढाणा,श्री विजय कानडजे रा. बुलढाणा,श्री अनिल जाधव यांचा सायकल वारीत सहभाग राहणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!