बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या सहा महिन्यात 70 दुचाकी चोरी झाल्याची घटना ‘हॅलो बुलढाणाने’ उघडकीस आणली.
‘पोलिसांची काठी चोरट्यांच्या माती कधी?.. दुचाकी चोरट्यांचा पोलिसांना खो!’ अशा शीर्षकाखाली रोखठोक वृत्त प्रसारित करण्यात आले होते. दरम्यान पोलीस विभाग सतर्क झाला असून आज 2 दुचाकी चोरांचे गुन्हे उघड केले आहे.त्यांनी जेरबंद केले आहे. संतोष विष्णू रावळकर राहणार कुऱ्हा या आरोपीला अटक करण्यात आली.40000 रुपयांची होंडा कंपनीची ड्रीम मोटरसायकल, होंडा कंपनीची शाईन ही 50000 रुपयांची मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे.