spot_img
spot_img

मध्यरात्रीची 3 वाजताची वेळ.. ‘चुकीला माफी नव्हतीच!’ – पवार कुटुंबीयांच्या अंगाला घाम फुटला होता..!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मध्यरात्रीच्या 3 वाजताची वेळ म्हणजेच 11 जुलै ची पहाट होत असताना, ढवळ्या मातीच्या घरातील अचानक काही भांडे खाली पडल्याचा आवाज झाल्याने, साखरझोपेतील कुटुंब धाडकन जागे झाले..अन् त्यांच्या अंगाला घाम फुटला! कारण लाईट लावताच विषारी 5 फुटाचा कोब्रा धाब्यावर लटकत फुत्कार सोडत होता. भिका नारायण पवार रा.अजिसपुर यांच्या घरातील अंगावर शहारे आणणारा हा क्षण होता. परंतु सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन केल्याने, ते तत्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी कोब्रा शिताफीने बरणीबंद केल्याने पवार कुटुंबीयसह उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला.

साप म्हटले की,अनेकांची भांबेरी उडते.हा सरपटणारा प्राणी मृत्यूत समजल्या जाते. त्याला धक्का जरी लागला तरी, त्याच्याकडे चुकीला माफी नाही! पावसाळी दिवसात बिळात पाण्याने शिरकाव केल्याने साप बाहेर पडतात. तसेही ते खाद्याच्या शोधात असतात.घरातील उंदीर खाण्यासाठी ते घरात शिरतात. 11 जुलै च्या मध्यरात्री तीन वाजता भिका पवार यांच्या घरात विषारी जातीच्या कोब्रा नागाने पवार कुटुंबीयांची झोप उडवली.पवार कुटुंबीयांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना गोळा केले.परंतु एकाचीही हिम्मत या 5 फुटी लांबीच्या नागाला पकडण्याची झाली नव्हती.नागाचा फुत्कार सगळ्यांना घाम फोडणारा होता.दरम्यान सर्पमित्र रसाळ यांना फोन करून या घटनेची माहिती देण्यात आली.रसाळ यांनी कार्यतत्परता दाखवली आणि 3.45 वाजता ते घटनास्थळी पोहोचले.तोपर्यंत नाग दडून बसला होता.त्याला धुंडाळून रसाळ यांनी मोठ्या शिताफीने बरणीबंद करून आज नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.दरम्यान अजीजपुर येथील सुशील जगताप,पांडुरंग पवार,श्रीराम जगताप,शेषराव जगताप,शंकर जगताप, संदीप जगताप,अशोक राऊत,विशाल पवार, भगवान जगताप यांनी घटनेची अनुभूती घेत सर्पमित्र रसाळ यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थितांना सर्पमित्र रसाळ यांनी सापाविषयी मार्गदर्शन सुद्धा केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!