बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आमदार निवासातील निकृष्ट डाळी वरून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजरला मारहारण केल्याचे प्रकरण राज्यात गाजतेय.कॅन्टीनचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आलाय. बुलढाणा मतदारसंघातही मुलींचे वस्तीगृह, जिल्हा सामान्य रुग्णालयात व स्त्री रुग्णालयात निकृष्ट जेवण देत असल्याची ओरड आधीची आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जेथे जेवण बनवले जाते त्या स्वयंपाक घराला लागून प्रचंड घाण पसरली आहे, त्यामुळे आमदार संजय गायकवाड याकडे कधी लक्ष पुरवतील? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राज्य शासन मुलींचे वस्तीगृह म्हणा की जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गोरगरीब रुग्णांना शासनाकडून मोफत जेवणाची सुविधा पुरविते.मात्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय हे भ्रष्टाचारात गणले जाते.येथे रुग्णांसाठी जेवण बनविल्या जाते त्याच स्वयंपाक घराच्या बाजूलाच प्रचंड घाण साचली आहे. जिल्हा रुग्णालयात नाशिकच्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असल्याचा व आहार पुस्तिके प्रमाणे जेवण दिले जात नसल्याचा रुग्णांचा कित्येक दिवसापासून आरोप व तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे दिलेल्या आहेत.मुलींच्या वस्तीगृहात देखील जेवण चांगल्या दर्जाचे भेटत नसल्याची ओरड आहे.एकीकडे लोकप्रतिनिधी आमदार निवासात निकृष्ट डाळीवरून मारहाण करतात व कॅन्टीन चा परवाना रद्द केला जातो.मात्र बुलढाणा मतदार संघात रुग्णालयातील रुग्णांणा देण्यात येणाऱ्या आणि पोषक आहाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आमदार साहेबांनी आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष वेधावे अशी मागणी होऊ लागली आहे.
क्रमशः