बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नगरपालिकेच्या दुर्लक्षाने बुलढाण्यातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. याबाबत तत्पूर्वी शहर भाजपाकडून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.यावर कार्यवाही झाली नसताना आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी रस्ते दुरुस्ती बाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बुलडाणा शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यासंदर्भात नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकारी गणेश पांडे यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली. खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करा अशी मागणी करण्यात आली.
बुलडाणा शहरातील अनेक रस्ते पावसामुळे उखडले असून त्यामुळे अपघात होतायेत. हे खड्डेमय रस्ते तात्काळ दुरुस्त करा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेलगू नगर ते टिपू सुलतान चौक हा रस्ताही खूप धोकादायी झाला असून त्यामध्ये खड्डे पडले आहेत, पाणी साचले आहे. या रस्त्यावर अपघात होतायेत. सर्वत्र चिखल झालाय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या सर्व गोष्टी तूपकर यांनी नगरपालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या..रस्त्याचे काम तात्काळ झाले नाही तर बुलडाणा न.प. प्रशासनासमोर आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी न.प.मुख्याधिकाऱ्यांना दिला. यावेळी ॲड. राज शेख, दिलीप राजपूत, अतुल तायडे,मोहम्मद दानिश अजहर, मिर्जा नावेद, फरदीन लाला, नदीम शेख,नवाज मिर्जा, चंद्रशेखर देशमुख उपस्थित होते.