spot_img
spot_img

बुलढाण्याच्या ‘कस्तुरे काकू’ राज्य परिषदेत!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या संघर्षकाळात पक्षाची ध्वजपताका खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावंत नेत्या, कुशल संघटक व मार्गदर्शक वैजयंतीताई कस्तुरे (कस्तुरे काकू) यांची भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी निवड झाली आहे. हा बुलढाणा शहरासाठीही मोठा अभिमान आहे.

कस्तुरे काकू या बुलढाण्याच्या माजी नगरसेविका असून त्यांनी कार्यकाळात असंख्य दर्जेदार विकासकामे करून आपला ठसा उमटवला. भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष गोकुलजी शर्मा यांच्या काळात शहरात जो विकासाचा धडाका बसला, त्यात कस्तुरे काकूंचे योगदान लक्षणीय होते.

भाजपच्या फाउंडर कमिटीतून सुरुवात करून पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या या कार्यकर्त्यांना आज राज्य पातळीवर मान्यता मिळाली आहे. भाजपने त्यांच्या कामाची पावती देत भाजपा राज्य सदस्यपदी निवड करून बुलढाणा शहराच्या या लढवय्या नेतिचा सन्मान केला आहे. कस्तुरे काकूंसारख्या कार्यकर्त्या म्हणजे पक्षाची खरी ताकद असल्याचे पुन्हा सिद्ध झाले!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!