spot_img
spot_img

कुठे निघाली विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक?

चिखली (हॅलो बुलढाणा- राजेंद्र घोराडे) उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून सुरू होत असलेल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आणी शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता पहिलीच्या प्रवेश पात्र चिमुकल्यांचे बैलगाडीतून फेरी काढून व औक्षण करून जिल्हा परिषद शाळा,शेलोडी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फ उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असतांना, आणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिकवण्यात कमी पडत असतांना,जी.प.शाळा शेलोडी येथील पटसंख्या मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे,यामागे शेलोडी येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील जागरूक युवक यांची आपली शाळा सुंदर करण्याचा चंग त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांची मेहनत असल्याचे गावकरी आनंदाने व अभिमानाने सांगतात.
यावर्षीसुद्धा जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा शेलोडी येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे व शाळेत वेगवेगळ्या वर्गामध्ये नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्द्तीने स्वागत करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!