spot_img
spot_img

💥’गण गण गणात बोते’चा जयघोष!’ ‘गुरुपौर्णिमा निमित्त शेगाव नागरी भाविकांनी फुलली!’

शेगाव (हॅलो बुलडाणा) गुरु पौर्णिमेनिमित्त संत शेगाव नगरी भाविकांच्या गर्दीने फुलली असून, ‘गण गण गणात बोते च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय.

श्री गजानन महाराजांच्या शेगाव संत नगरीत आज मोठा उत्सव आहे. गजानन महाराजांना लाखो लोक गुरु मानतात. आज गुरुपुष्य अमृत निमित्ताने संत नगरीत शेगावात भाविक व शिष्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग आहे. जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो, तेव्हा हा शुभ योग मानला जातो. या योगाला ‘गुरुपुष्यामृत’ किंवा ‘अमृत सिद्धी योग’ असेही म्हणतात.
शेगावात, गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.  सायंकाळपर्यंत दर्शनासाठीचा वेटिंग टाईम 3 ते 5 तासांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.या दिवशी, भक्त मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक आणि भजन-कीर्तनात सहभागी होतात. तसेच, अनेक लोक या शुभ मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे, सोने-चांदी खरेदी करणे किंवा दानधर्म करणे शुभ मानतात.
शेगावात, गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच, गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये, भजने, कीर्तने, प्रवचने, आणि विविध धार्मिक विधींचा समावेश असतो. या दिवसाच्या निमित्ताने, शेगाव शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण असते.त्यामुळे आज राज्यातील व परराज्यातील भाविकांच्या गर्दीने श्री संत गजानन महाराजांचे संस्थान फुलले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!