spot_img
spot_img

आता बुलढाणा सैनिकी शाळा नव्हे,राष्ट्रीय सैनिकी स्कूल! – नाव बदलास शासकीय मान्यता!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आता बुलडाणा सैनिकी शाळेचे नांव बदलले असून,राष्ट्रीय सैनिक स्कूल या नावाने ही शाळा ओळखली जाणार आहे. बुलडाणा येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल या निवासी सैनिकी

शाळेचे नाव बदलण्यात आले आहे. यापूढे सैनिकी शाळेचे नांव राष्ट्रीय सैनिक स्कूल असे संबोधले जाणार आहे. नुकतेच या बदलास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. स्व. विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था, बुलडाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल ही निवासी सैनिकी शाळा गत 25 वर्षापासून बुलडाणा येथील अजिंठा रोडवर कोलवड परिसरात कार्यरत आहे. नुकतीच भारत सरकारच्या संरक्षण विभागाने सदर सैनिकी शाळेला जोडून स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळेस मान्यता दिली असून आता ही शाळा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात 100 सैनिकी शाळा स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना होती. त्यानूसार देशामध्ये विविध ठिकाणी केंद्र सरकारने स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळांना मान्यता दिलेल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील बुलढाणा येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूल या सैनिकी शाळेला स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळेची मान्यता मिळाल्यामूळे बुलढाण्याच्या इतिहासात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.भारतीय सैन्यदलात जास्तीत जास्त अधिकारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून निर्माण व्हावे, या उद्देशाने देशपातळीवर संरक्षण विभागाच्या अंतर्गत सैनिकी शाळा स्थापन करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता.

त्यानूसार संस्थेने 2022 मध्ये रितसर प्रस्ताव सादर केला होता. त्यानूसारच केंद्रीय पथकाने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन सर्व सोईसुविधा व आतापर्यंत सैनिकी शाळेने देशाला दिलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांची बाब लक्षात घेऊन तपासणी केली होती. त्यानूसार सदर मान्यता नुकतीच प्राप्त झाली असून चालु शैक्षणिक वर्षापासून देशपातळीवरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दाखल होणार आहे. बुलढाणा जिल्ह्याला हा बहुमान मिळाल्यामूळे राज्यातील मोजक्या सैनिकी शाळेमध्ये सातारा व चंद्रपुर या केंद्रीय सैनिकी शाळेसोबत बुलढाणा जिल्ह्यातील सैनिकी शाळेची तुलना होऊ लागली आहे. दरम्यान आता ही शाळा राष्ट्रीय सैनिकी स्कूल म्हणून ओळखली जाणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!