बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आषाढी एकादशी व मोहरम च्या बंदोबस्तासाठी धाड येथे गेलेल्या चिखली येथील होमगार्ड पथकातील शिपाई विठ्ठल पिराजी परिहार बंदोबस्त आटोपून परतत असताना,त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन ते गंभीर झाले. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक बीबी महामुनी व ठाणेदार संग्राम पाटील यांच्या तत्परतेने जखमी विठ्ठल यांना रुग्णालयात हलवून उपचार करण्यात आल्याने त्यांच्या जीविताचा धोका टाळला आहे.त्यामुळे एका विठ्ठलाला दुसरा खाकीतील विठ्ठल मदतीसाठी धावून आल्याची प्रचिती आली आहे.
आषाढी एकादशी व मोहरमच्या बंदोबस्तासाठी धाड येथे होमगार्ड पथकातील शिपाई विठ्ठल परिहार हे गेले होते.शांततेत उत्सव पार पडले आणि बंदोबस्त आटोपून विठ्ठल परिहार चिखलीच्या दिशेने निघाले.परंतु परतीच्या प्रवासात त्यांचा अपघात झाला.या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक बीबी महामुनी यांना मिळताच त्यांनी चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांना या संदर्भातील माहिती दिली. दरम्यान संग्राम पाटील यांनी चिखली येथील जवंजाळ यांच्या हॉस्पिटलमध्ये जखमी विठ्ठल परिहार यांना तात्काळ दाखल केले.त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.त्यामुळे खाकीतील विठ्ठलच त्यांच्या मदतीला धावून आले असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांना व्यक्त केली.