बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्हा पोलीस दलात भास्कर उत्तमराव वानखेडे रा.वाडी ब्रह्मपुरी यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
जिल्हा पोलीस दलातील भास्कर उत्तमराव वानखेडे यांनी पोलीस कॉन्स्टेबल ते श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशी 36 वर्ष गुणवत्ता पूर्ण सेवा दिली.त्याचप्रमाणे त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती यांच्याकडून 15 ऑगस्ट 2022 रोजी घोषित झालेले राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे 2025 मध्ये प्रदान करण्यात आले. त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. हे पदक बुलढाणा पोलीस दलाला तब्बल दहा वर्षानंतर मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.














