बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी या आमदार महोदयांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी करीत त्यांच्यावर टीका केली आहे.
‘हॅलो बुलढाणा’ने यासंदर्भात जयश्री शेळके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे.त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात देत आहोत..त्या म्हणाल्या की,दिल्लीची जीहुजुरी करण्यात किती लाचारी पत्करायची याला काही मर्यादा? परंतु या सर्व मर्यादेला पार धुळीला मिळविण्याचे काम काही एसएनसी गटाचे प्रमुख व आमदार करीत आहे.काल एका आमदार यांनी जे काही वक्तव्य केले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, महाराणी येसूबाई, महाराणी ताराराणी यांचा अवमान करण्याचे काम या आमदार महोदय यांनी केले आहे.त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजेआणि ज्यांची शिवसेना नकली,गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली अशा अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्र प्रेमाची व खऱ्या मराठी प्रेमाची आपण अपेक्षा करू शकत नाही, अशा शब्दात जयश्री शेळके यांनी बोचरी टीका केली.