डोणगाव (हॅलो बुलडाणा / अनिल राठोड) मोहरम दरम्यान प्रत्येक ताजिया व सवारी जवळ एक आशीर्वाद देण्याचे प्रचलित साधन म्हणून मोरांच्या गळालेल्या पिसांची मोरचल असते. त्याने आशीर्वाद देण्याची प्रथा फार पूर्वी पासून सुफी परंपरणे चालत आलेली आहे. अश्यातच महोरमच्या नऊ तारखेला सवारी उचलल्या जाते आणि सवारी उचलण्याच्या प्रथेला सुरवात होणार त्याच वेळेस एक मोर उडत आला आणि सवारी जवळच जावून बसला त्याला पाहणारे अवाक झाले.
डोणगाव येथे फार पूर्वी पासून मोहरम दरम्यान सवारी बसवण्याची प्रथा आहे. येथे श्रीराम मठा जवळ बंगला आहे. या ठिकाणी सवारी बसवली जाते. त्याचे 5 जून रोजी मोहरमची 5 तारीख होती. या दिवशी सवारी उठवण्याची तयारी सुरु असतांना 4:30 वाजता दरम्यान एक मोर उडत आला आणि सवारी जवळ जावून बसला. दरम्यान मोराला बघणाऱ्याची गर्दी वाढली तेव्हा हमीद कुरेशी यांनी वन विभागाला कॉल करून मोर आल्याची माहिती दिली व वन विभागाचे घाटबोरी वन परिक्षेत्र अधिकारी अंकुश येऊल यांनी वन रक्षक खोडवे, विणकर यांना पाठवून तो मोर ताब्यात घेतला. या वेळी माजी सरपंच संजय आखाडे, राजेंद्र आवटी सह अनेक जण उपस्थित होते.