बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहर पोलीस ठाणे तसेच ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीमध्ये जुगार राजरोसपणे सुरू आहे. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी मात्र या अवैध धंद्याला टार्गेट केले आहे.ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तपूर फाट्या जवळ पैशाच्या हारजीत वर सुरु असलेल्या ‘एक्का बादशाह’ जुगारावर एलसीबीच्या पथकाने काल
धाड टाकली. यावेळी 9 आरोपींना ताब्यात घेतले असून, तब्बल 2 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
शहरी व ग्रामीण भागात पत्त्यांचा जुगार कुठे छुप्या मार्गाने तर कुठे राजरोसपणे खेळला जात आहे.या जुगाराच्या व्यसनात लहान मुलांसह मोठे व्यक्ती गुंतल्याचे चित्र आहे.या जुगारातून कर्जबाजारीपणा ओढवून अनेकांची कुटुंबे उध्वस्त होत आहे. दरम्यान बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तपुर फाट्याजवळ एक्का बादशाह नावाचा जुगार सुरू होता. एलसीबी च्या पथकाने यावेळी शिताफिने जुगारावर धाड टाकून 9 आरोपींना ताब्यात घेतले. जुगाऱ्यां कडून नगदी 24600 रूपये रोख, 33000 रुपये किंमतीचे 5 मोबाईल, 200000 रुपयांच्या 5 जून्या मोटरसायकल व 52 पत्ते किंमत 50 असा एकुण 2,57,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरोधात कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पीएसआय पंकज सपकाळे, एएसआय ओम प्रकाश सावळे, एचसी राजेंद्र अंभोरे,एजाज खान, दिगंबर कपाटे, संजय भुजबळ, अमोल शेजवळ, अजिज परसूवाले, विक्रांत इंगळे यांनी केली.