spot_img
spot_img

रात्रगस्तीत संशयास्पद वाहन पकडले, मोठा चोरीप्रकरणाचा उलगडा! जालना-पंजाबची टोळी चिखलीत अडकली – पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखलीतील न्यू कृष्णा ट्रेलर वेल्डिंग वर्कशॉपमधील तब्बल ₹72,000 चा साहित्य चोरीप्रकरणी चिखली पोलिसांनी झडप घालून बाहेर जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व वापरलेले वाहन असा सुमारे ₹2.85 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १९ मे रोजी रात्री दुकान फोडून वेल्डिंग मशीन, ट्रॉली डिस्क, असेम्ब्ली प्लेट, हँड ग्राइंडर, पाईप कटर आदी साहित्य लंपास करण्यात आले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथक सक्रिय झाले.गुन्ह्यात वापरलेले वाहन एमएच-४८ टी २५०७ हे रात्रगस्तीदरम्यान संशयास्पद आढळून आले. तपासदरम्यान वाहनातून चोरीच्या साहित्याचे अवशेष मिळाले. २ जून रोजी गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांपैकी मुख्य आरोपी इनूस पठाण (रा. जालना) याला अटक करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून दुसरा आरोपी सगबीरसिंग टाक यालाही ताब्यात घेण्यात आले.

या संपूर्ण कारवाईत चोरीस गेलेला बहुमोल मुद्देमाल आणि वाहन मिळवण्यात यश आले. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर अधीक्षक बी. बी. महामुनी व उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई झाली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!