spot_img
spot_img

विठ्ठलभक्तांचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधवांकडून स्वागत! – विठ्ठलदर्शन रेल्वे गाडीला दाखविली हिरवी झेंडी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आषाढी एकादशी निमित्य विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी खामगाव येथील रेल्वे स्थानकावर स्वागत केले आणि विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला ही हिरवी झेंडी दाखविली आहे.

दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठलभक्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. विठ्ठल भक्तांचा प्रवास सोईचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या मदतीने दरवर्षी खामगाव रेल्वे स्थानकातून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही रेल्वे गाडी सोडण्यात येते.या विठ्ठलदर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज दिनांक 3 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे खामगाव येथील रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या निनादात पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांचे स्वागत करून त्यांना अल्पोहारांचे आणि पाणी वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल दर्शन रेल्वे गाडीला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली. हि गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त झाली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, राजेश मिरगे, तालुकाप्रमुख राजु बघे , रामा थारकर शहर प्रमुख चेतन ठोंबरे, संतोष लिप्ते, महिला आघाडी प्रमुख जयश्री देशमुख, मयुरी शेजोळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, वारकरी आणि नागरिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!