देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) खडकपूर्णा नदी पात्रातील अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्यासाठी तक्रारींचा चेंडू आता लोकांयुक्तांच्या कोर्टात गेला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या तक्रारीनंतर लोकायुक्तकडून सुनावणीसाठी हजर राहण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंदखेड राजा उपविभागातील व चिखली तालुक्यातील परिसर हरित होण्यासाठी राज्य शासनाने खडकपूर्णा नदीवर जलाशयाचे काम पूर्ण केले अनेक वर्षापासून या नदीपात्रातील वाळूची हर्रासी न झाल्याने रेतीमाफिया यांनी आधुनिक बोटीच्या द्वारे जलाशयातील रेतीचा अवैध उपसा करून त्याची सर्रास विक्री सुरू करण्याचे काम दिवस-रात्र संबंधित यंत्रणांच्या यंत्रणा प्रमुखांना हाताशी धरून सुरू ठेवली आहे.अवैध वाळू उपसा व वाहतुकीची तक्रार झाली की महसूल विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी थातूरमातूर कार्यवाही करून मोकळे होतात सदर अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक पूर्णपणे बंद होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी शासन स्तरावर तक्रारी करून त्याचा पाठपुरावा केला असता शासनाने यासाठी संयुक्त पथक निर्माण करणे बाबत आदेश पारित केले यामध्ये महसूल विभाग, गृह विभाग, गृह विभागातील परिवहन विभाग, व जलसंपदा विभाग यांच्या तालुकास्तरी यंत्राप्रमुखांनी वेळोवेळी अवैध वाळू उपसा व वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे याद्वारे सूचित करून संबंधित या यंत्रणा प्रमुखांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीचा अहवाल स्वतंत्रपणे शासनाकडे सादर करण्याचे आदेशित करण्यात आले मात्र या आदेशानंतरही अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच राहिल्याने चंद्रकांत खरात यांनी लोकांयुक्ताकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्त यांनी यांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित यंत्रणा प्रमुखांना त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल घेऊन सुनावणीसाठी लोकायुक्त कार्यालयात बोलण्यात आलेले आहे. भविष्यात रेतीमाफीया कडून होणारी अवैध रेती उपसा व वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.