बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नियत वयोमानाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलातून 15 पोलीस अधिकारी व अंमलदार काल 30 जून रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांचा कुटुंबीयासोबत सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रमाणपत्र, भेटवस्तू देत आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 30 जून रोजी सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळीजिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामूनी यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सेवानिवृत्त प्रमाणपत्र, झाडांचे रोपटे व भेटवस्तू तसेच साडी देऊन गौरविण्यात आले. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोउपोनि विश्वनाथ रामसिंग राठोड, पोउपनि गुलाबराव केशवराव काळे, पोहेकॉ प्रविण कान्होबा बोर्डे, सफौ रमेश विटोबा बाजड, पोउपनि राजु जगदेव आगासे, सफौ रविंद्र काशीराम वानखडे,पोउपनि विलास श्रीपत कड,पोहेकॉ दत्तात्रय बाजीराव लोंढे,सफौ विजयसिंह रामकृष्णा महाले, पोहेकॉ रामप्रसाद पांडुरंग चतुर,सफौ नागोराव बा.पवार, सफौ अरुण बा इंगोले,सफौ गणेश मोतीराम पवार, पोकॉ भगवान लक्ष्मण नागरे, पोहेकॉ सुनिल मानिकराव दळवी असे 15 पोलीस अधिकारी व अंमलदार सेवा निवृत्त झाले असून त्यांना निरोप देण्यात आला आहे.