बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुलभूत सोयी सुविधांच्या अभावामुळे बुलढाणेकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर आलाय.आज भाजपाने नागरी समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी यांना विविध समस्यांच्या सोडवणूकी संदर्भात निवेदन दिले आहे.
भारतीय जनता पार्टी शहराच्या जनहितासाठी सदैव तत्पर असते. वेळोवेळी उद्भवलेल्या समस्यांकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधत असते.आजही भाजपाने जनतेला त्रासदायक ठरत असलेल्या विविध समस्यांबाबत त्वरीत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. प्रामुख्याने स्वच्छता अभियानातील त्रुटी आणि निष्क्रियतेबाबत पावले उचलावी, मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा,नगरपरिषदेच्या हद्दीतील स्वच्छतागृहांची उपलब्धता व सुव्यस्था योग्य ठेवण्यात यावी, झाडांची फांदी कटाई व विल्हेवाट लावण्यात यावी, देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असून उपाययोजना राबविण्यात याव्या तसेच रुख्माई विद्यालय ते चिखली रोडचे रुंदीकरण व दुरुस्ती करावी अशा समस्या तात्काळ मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा भाजप बुलढाणा शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी नगरपरिषद प्रशासनास निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर कामगार आघाडी प्रदेश नेते विश्राम पवार, अण्णासाहेब पवार, महिला मोर्चाच्या सौ.सिंधुताई खेडेकर, सौ.उषाताई पवार, सौ.अलका पाठक, बाबा वरणगावकर, अॅड. दसरथसिंग राजपूत, नारायणजी हेलगे, अरविंद होंडे, वैभव इंगळे, आशुतोष वाईकर, यतीन पाठक, अनुसूचित जाती मोर्चा युवा नेते बाळू ठाकरे, गजानन अवसरमोल, बाबुराव गायकवाड, कामगार आघाडीचे विमलजी बेंडवाल, सुदेश देवकत्ती, मिलिंद कुलकर्णी, युवा मोर्चाचे करण बेंडवाल, सचिन सूर्यवंशी यांसह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.