बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एका रुपयात फॉर्म येतो.. मात्र लाईन मध्ये उभे राहण्याचा त्रास आणि लवकर काम होण्याच्या उद्देशाने वेंटिगवर असलेले गोरगरीब मजूर मात्र एजन्टच्या फाश्यात पडत असून त्यांचा मोठा अवैधपणे फायदा घेतल्या जात आहे.याचा व्हीडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या स्वतःच्या बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्यात बांधकाम कामगारांसाठी किचन सेट वाटपाचा कॅम्प आयोजित करण्यात आले होते पण यात दलाल व कंपनीचे लोकांनी ₹ 800 ते 1000 घेऊनच किचन सेट वाटप केले,असा आरोप होत आहे. त्यामुळे सर्वात मोठा पुरावा व्हायरल झालेला व्हीडिओ आहे, जो समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. काल परवाच कामगार मंत्री यांनी दलालावर कारवाई करण्याची घोषणा केली होती,आता मोताळा येथील या प्रकरणावर कामगार मंत्री काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.










