खामगाव (हॅलो बुलडाणा) गेल्या अनेक महिन्यापासून हिवरा बु.गावच्या रस्त्याचे काम सुरू आहे.मात्र अद्यापही या रस्त्याच्या साईटवर सुध्दा बरोबर काम केले नाही. सर्व निकृष्ट दर्जाचे काम संबधित ठेकेदार करत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यूला आमंत्रण मिळत असून,जणू काही रस्त्यावर यमदूत बसल्याचे चित्र आहे.
रस्ते विकासाच्या वाहिन्या समजल्या जातात. पावसाळा सुरू झाला यात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघात होऊ शकतो. त्याच कारणांमुळे हिवरा बु गावतील एसटी बस बंद करण्यात आली असुन विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबधित ठेकेदाराला विचारणा केली असता, उडवा उडवीचे उत्तर देत आहे. या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडून कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात सर्व गावकरी यांनी ठिय्या आंदोलन केले व संबंधित ठेकेदाराने आश्वासन दिले की, दोन दिवसांत रस्ता एक साईट भरुन काढू, पण असे न झाल्यास सर्व गावकरी आंदोलन अधिक तीव्र करणार, असा इशारा शिवसेनेचे विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिला आहे.