spot_img
spot_img

💥भीषण! चार चाकी वाहनाच्या पाच वेळा पलट्या! – एक जण ठार,भाजप अध्यक्षासह तिघे जखमी!

लोणार (हॅलो बुलडाणा/ संदीप पाटील)लोणार तालुक्यात मध्यरात्री अपघाताची भीषण दुर्घटना घडली. मेहकर लोणार रस्त्यावरील वडगाव तेजन जवळ चार चाकी वाहनाने ५ पलट्या घेतल्या..या भीषण अपघातात १ जण जागीच ठार तर भाजप अध्यक्षासह तिघे जखमी झाले. मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत. ते मेहकर वरून लोणार कडे जात होते. या अपघातात ऋषभ बाबुलालजी बगडिया (२६, रा.लोणार) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. भाजप शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह तिघे जखमी असून त्यांच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार एम एच २८, बी. डब्ल्यू ०९५९ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चार चाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास मेहकर वरून लोणार कडे जात होते. काल दिवसभर मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमीन खरडून गेली. वडगाव तेजन जवळ शेतातील माती खरडून मुख्य रस्त्यावर आलेली होती. त्या मातीवर चार चाकी वाहन स्लीप झाले, गाडीने चार ते पाच वेळा पलट्या मारल्या.या अपघातात ऋषभ बाबुलालजी बगडिया याचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. अपघात ग्रस्त युवकांना तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले.. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता..
दरम्यान एवढा मोठा वर्दळीचा रस्ता असताना आणि काल रात्री एवढा भीषण अपघात झालेला असताना देखील रस्त्यावरच चिखल यंत्रणे कडून दुपार पर्यंत हटवलेला नसल्याने अजून ही याठिकाणी दोन चाकी वाहनांचे लहान मोठे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!