spot_img
spot_img

लोणीकरांवर तूपकरांची तोफ.. – माफी मागा,अन्यथा तुम्हाला शेतकरी बुटांनी हाणतील!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘बबनराव तुम्ही ‘लोणीकर’ असाल तर मी पण ‘तुपकर’ आहे लक्षात ठेवा..तुमच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, तुमच्या ताटातलं जेवण आम्हा शेतकऱ्यांमूळे आहे..शेतकऱ्यांची माफी मागा अन्यथा शेतकरी बुटाने हाणतील..!अशी तोफ शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बबनराव लोणीकरांवर डागली आहे. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तूपकरांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे असे वक्तव्य लोणीकर यांनी केले. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असेही लोणीकर म्हणाले.या वक्तव्यावरून शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून,शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट लोणीकर यांना इशारा दिला आहे.’बबनराव तुम्ही ‘लोणीकर’ असाल तर मी पण ‘तुपकर’ आहे लक्षात ठेवा..तुमच्या अंगावरचे कपडे, मोबाईल, तुमच्या ताटातलं जेवण आम्हा शेतकऱ्यांमूळे आहे..शेतकऱ्यांची माफी मागा अन्यथा शेतकरी बुटाने हाणतील..! असा घणाघात तूपकर यांनी केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!