spot_img
spot_img

आत्महत्या नसून हत्याच! – स्व.पंकज देशमुख मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) माझ्या पतीची हत्याच झाली असून या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा, अशी मागणी स्व.पंकज देशमूख यांच्या पत्नीने केली आहे. हीच मागणी उचलून धरत न्याय हक्क जन आंदोलन समिती जळगाव जामोदच्यावतीने पत्रपरीषद घेऊन जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.

आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले
स्वर्गीय पंकज देशमुख हे भाजपा कार्यकर्ता होते. तीन मे 2025 रोजी त्यांच्या वायाळ शिवारातील शेतात लहान झाडाला फाशी घेतली होती.मात्र स्थानिक पोलिसांनी या मृत्यूची चौफेर बाजूने तपासणी न करता एकतर्फी आत्महत्या असल्याचे पत्रकारांना सांगितले होते.मात्र स्वर्गीय पंकज देशमुख यांचे कुटुंब व नातेवाईक यांनी पंकज यांची हत्या झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!