चिखली (हॅलो बुलडाणा) नियमबाह्य शिक्षण सेवकांची भरती जिल्हा परिषदेने केली आहे मात्र या भरतीची चौकशी करून संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करावे,अशी मागणी भारतीय मानवाधिकार संघटन तर्फे करण्यात आली आहे.सन २०२४ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शासनाकडून नविन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवक विहित मुदतीत नियुक्त केलेल्या शाळेवर रूजु न झाल्यामुळे रमेश रतन डुकरे पाटील,गटशिक्षण अधिकारी पं.सं. चिखली जि. बुलडाणा यांनी लाखो रूपये घेऊन शिक्षक सेवकांना नियमबाह्य रूजू करून घेतल्या प्रकरणी तात्काळ उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश रतन पाटील यांना तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करणे बाबत भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने प्रधान सचिव (शालेय शिक्षण) महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई-३२,आयुक्त (शिक्षण) नविन प्रशासकिय इमारत पुणे, आयुक्त (अमरावती विभाग अमरावती),शिक्षण संचालक (प्राथमिक) नविन प्रशासकिय इमारत पुणे
यांना जिल्हाधिकारी बुलडाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या मार्फत देण्यात आले. शासनाकडून सन २०२४ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सवक पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती.
सदर भरती प्रक्रिये मध्ये उमेदवारांनी शिक्षण सेवक पदासाठी निवड झाली अशा उमेदवारांच्या निवड याद्या बुलडाणा यांचेकडे पाठविण्यात आलेल्या होत्या. सदर उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी होऊन सदर झालेल्या उमेदवारांना आदेश दिलेले होते. सदर नियुक्ती आदेशात निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती प्राप्त आदेशापासून १५ दिवसांचे आत शारिरीक तपासणी करून नियुक्तीच्या ठिकाणी रूज होणे बंधनकारक होते. उमेदवार १५ दिवसांचे आत रुजु न झाल्यास संबंधीत नियुक्ती आदेश रद्द समजण्यात येईल एवढे स्पष्ट आदेश देण्यात आलेले होते. असे असतांना जि.प. बुलडाणा येथून श्री. विशाल नरवाडे यांची मार्च २०२४ मध्ये बदली धुळे येथे झाली त्यांचे जागेवर श्री. मोहन यांचेकडे मु.का.अ.जि.प. बुलडाणाचा प्रभार देण्यात आलेला होता. तदनंतर श्री. कुलदिप जंगम यांची नियुक्ती शासनाने केलेली होती. जुन २०२४ मध्ये श्री. कुलदिप जंगम साहेब मुकाअ पदावर कार्यरत असतांना मुध्दा शिक्षण सेवकांनी ११. मार्च २०२४ चे श्री. विशाल नरवाडे यांचे नियुक्ती आदेश पं.स. चिखलीचे गटशिक्षणाधिकारी रमेश रतन पाटील यांचेकडे आणले व रमेश पाटिल यांनी सदर शिक्षण सेवकांकडुन लाखो रूपये घेतले व त्यांना नियमबाह्यरित्या पं.सं. चिखली येथे रुजु करून घेतले. तसे आदेश रमेश पाटील यांनी शिक्षण सेवकांच्या अर्जावर लिखीत स्वरूपात संबधीत लिपीक यांना जुन २०२४ मध्ये आदेश दिलेले आहे, त्यामुळे निवेदन करताना आरोप केला आहे की, श्री. विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा हे मार्च २०२४ मध्ये बदलून गेल्यावर श्री. मोहन मुख्य कार्यकारी अधिकारी व तदनंतर श्री. कुलदिप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारी हे माहे जुन २०२४ मध्ये कार्यरत असतांना रमेश रतन पाटील गटशिक्षण अधिकारी यांनी सदर शिक्षणसेवकांचे नियुक्ती आदेशावर श्री. कुलदिप जंगम साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी (मु.का.अ) यांचेकडे मार्गदर्शन मागणे क्रमप्राप्त होते. तसे न करता आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जावून रमेश रतन पाटील यांनी पदाच्चा दुरूपयोग करून नियमानुसार नियुक्ती झालेले शिक्षण सेवकांचे आदेश हे नियमबाह्यरित्या शिक्षण सेवकांना कसे रूजु करून घेतले हे संबधीत आदेशानुसार आपल्या लक्षात येते. तरी या सर्व प्रकरणामुळे जे सुशिक्षीत बेरोजगार प्रतिक्षायादीत होते त्यांचेवर एक प्रकारे अन्याय झालेला आहे. वास्तविक ११ मार्च २०२४ पासून १५ दिवसांच्या आत निवड झालेले उमेदवार हे नियुक्तीच्या ठिकाणी रूजु न झाल्यास संबंधीत उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करून पवित्र पोर्टल म्हणजे शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे अहवाल पाठविणे क्रमप्राप्त होते.
या सर्व प्रकरणामध्ये लोखो रूपयांचा भ्रष्टाचार, गैरमार्गाने पैसे घेणे संगनमत करणे असे प्रकार रमेश रतन पाटील गटशिक्षणाधिकारी यांनी केलेले असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांचेवर नियमानुसार गुन्हे दाखल करावे व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबीत करावे.व तदनंतर दोषी आढळून आल्यास कायमस्वरूपी बडतर्फ करावे.
अन्यथा भारतीय मानवाधिकार संघटने च्या वतीने दि 30 एप्रिल 2025 पासून लोकशाही मार्गाने अन्न त्याग आंदोलनास सुरुवात करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन देते वेळी प्रशांत डोंगरदिवे जिल्हा अध्यक्ष, संदीप गवई जिल्हा सचिव, संदीप बोर्डे तालुका अध्यक्ष बुलडाणा, प्रकाश भराड तालुका उपाध्यक्ष चिखली, विरसेन साळवे सल्लागार, गौतम डोंगरदिवे सदस्य यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.