बुलढाणा (हॅलो बुलडाणा) गौतम नगर, धामणदरी येथे निर्मला राजेश बिबने यांच्या राहत्या घरात मध्यरात्री भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झालं. ही घटना काल शुक्रवार रात्री २.२५ च्या सुमारास घडली असून, आगीत घरातील फ्रिजचा सिलेंडर स्पोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. काही क्षणातच संपूर्ण घर भडकत जळून भस्मसात झालं.आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून, हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी कुटुंब उघड्यावर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी गजानन गोरे यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल रियाज (वाहन विभाग प्रमुख), इस्माईल शेख (चालक), नितिन सोनुने, अनुप खरे, वैभव जाधव, अमोल जाधव हे फायरमतनीस घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नांती आग आटोक्यात आणली.