सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरी छुपके अवैध धंदे सुरू आहे. पोलीस प्रयत्न करीत असले तरी, अवैध जुगार दारू विक्री खुलेआम सुरूच आहे. असाच सिंदखेडराजा पोलीस हद्दीतील चिंचोली गावात एका बारच्या भिंती आड जुगाऱ्यांनी हैदोस मंडला होता. दरम्यान एलसीबीच्या पथकाने छापा टाकून 11 जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात विविध ऑनलाइन पद्धतीच्या जुगाराने तरुणाईला व्यसन लावले आहे. ऑनलाइन जुगारामुळे कर्जबाजारी होऊन कुटुंब उद्ध्वस्त होतात. कर्जाच्या फेऱ्यात फसलेल्या तरुणांना शेवटी आत्महत्येकडे वळावे लागल्याचे वास्तव आहे. यातून नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक होते. त्यातच आता विविध नामांकित कंपन्यांनी टीव्हीवर जाहिराती सुरू केल्या असून, गेम्सच्या आड थेट जुगार खेळवला जातो. मात्र, हे प्रकार रोखण्यासाठी कायदेच अपुरे असल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाय गावखेड्यातील तीन पत्त्यांचा जुगार आधीच फोफावला आहे. हा जुगार थांबविण्याचे कडवे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे आहे. 21 जून रोजी सिंदखेडराजा पोलीस ठाणे हद्दीत 12 अ महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत 1 गून्हा दाखल करत 11 आरोपींना जुगार खेळताना पकडण्यात आले.जुगारी चिंचोली फाट्याजवळील शिवराज बारच्या भिंतीच्या आडोशाला पत्ते कुटत होते. एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने या जुगाऱ्यांना पकडून नगदी 40 हजार 200 पन्नास व जुगार साहित्य असा एकुण 1 लाख 44 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकातील एपीआय संजय मातोंडकर,एचसी दिगंबर कपाटे, दीपक वायाळ, मंगेश सणगाळे, ऋषिकेश थुट्टे, हर्षल जाधव, वनिता शिंगणे, समाधान टेकाळे यांनी ही कारवाई केली.