spot_img
spot_img

💥भीषण! ‘उभा ट्रक होता की यमदूत?’ भाविकांची बस धडकून 35 जखमी तर तिघे अत्यावस्थ!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मलकापूर- नांदुरा राष्ट्रीय महामार्ग, वडनेर भोलजी येथे पहाटे भीषण अपघात झाला.देव दर्शनासाठी निघालेली भाविकांच्या आंधप्रदेशच्या बसने उभ्या ट्रकला ठोकल्याने झालेल्या अपघातात 35 जण जखमी तर तिघे गंभीर झाल्याची बातमी समोर आली आहे.
देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्र प्रदेशातील कडप्पा येथील भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली. यातील काही जखमी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.बस मध्ये प्रवास करणारे भाविक आंध्र प्रदेश वरून नाशिक आणि शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते, अशी माहिती मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एसएचओ संदीप काळे यांनी याबाबत दिली आहे.बसचालकाच्या साखर झोपेत हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!