spot_img
spot_img

समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे..मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे! – आता पर्यंत 76625.25 हेक्टर क्षेत्र पेरणी, आभाळाकडे डोळे!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाने सात लाख 41 हजार 357 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 76625.25 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून 10.40 एवढी टक्केवारी आहे.

जिल्ह्यात पावसाने जोरदार सलामी दिल्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे. गेल्या आठवड्यात निसर्ग वादळाचा थोडाफार तडाखा बसला असला तरी, शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी समाधानाचे वातावरण आहे. कृषी विभागाने एकूण जवळपास सुमारे 7 लाख 41 हजार 357 हेक्टरवर यंदा खरिपाचे नियोजन केले आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधून योग्य पिकांची पेरणी करावी असे आवाहन करीत चढ्या दराने बी-बियाणे, खते विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईचा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिला आहे.पेरणी साठी लागणारे बियाणे, औषधे, खतांचा साठा विविध कृषी केंद्रात उपलब्ध झालेला असून, सोयाबीन या तेलवर्गीय पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी घरगुती पद्धतीचे बियाणे वापरावे यासाठी जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होणार असून शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतील, असे दिसून येत आहे. सध्या खरीपपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त आहे.परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतजमिनीत ओल झाली. या ओलीवर काहींनी खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या केल्या, तर अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

▪️4,24,754 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी!

खरीप हंगाम 2025-26 मध्ये जिल्ह्यात 7 लाख 41 हजार 357 हेक्टर क्षेत्र लागवडीचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सोयाबीन प्रमुख पीक असल्याने अर्धे अधिक क्षेत्र सोयाबीन व्यापणार आहे. यामध्ये 4,24,754 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी प्रस्तावित असून एक लाख 11 हजार 497 क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. तसेच 1,87,991 हेक्टर कपाशी लागवड प्रस्तावित आहे. त्याकरिता 9,39,955 बियाणे पाकिटाची आवश्यकता असली तरी सध्या 2,26,660 उपलब्ध आहेत. तूर,मुंग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची जवळजवळ 1,28,613 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!