spot_img
spot_img

बाटली आडवी होईल का हो? मात्र एलसीबीचा जोरदार प्रयत्न!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दारूबंदीच्या कारवाया केल्या आहेत.18 जून रोजी सिंदखेडराजा पोलीस स्टेशन हद्दीत 3 आरोपींना ताब्यात घेऊन पिंपरखेड फाटा येथून एक लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारूबंदी कायदा तसा तर कागदावर आहे. जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे.परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पदभार सांभाळल्या पासून अवैध दारू विक्रीवर काहीसा अंकुश लागला आहे.एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात अवैध दारू विक्रेत्यांवर अनेक कारवाया झाल्या. 18 जून रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपरखेड फाटा जवळ 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 16800 रुपये किमतीची देशी दारू व एक जुनी होंडा शाईन गाडी (60 हजार),एक विना नंबर प्लेटची हिरो होंडा(25 हजार) व एक जुनी अपाची पल्सर (65 हजार) असा एकूण एक लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कारवाई पीएसआय दत्ता नरवाडे,एस आय ओम प्रकाश सावळे,राकेश नायडू, विजेता पवार, दीपक वायाळ,राहुल बोर्डे या पथकाने केली आहे.

▪️ हे आहेत आरोपी..
1) संदीप कनीराम चव्हाण वय 40 वर्ष रा. राहणार आडगाव राजा तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा
2) सुनील रामेश्वर खंडारे व 31 वर्ष राहणार आडगाव राजा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा
3) रवी रामदास सरसरे व 29 वर्ष राहणार तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!