चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) MH 28 AG 2668 क्रमांकाच्या सुपर स्प्लेंडर व MH 28 BL 1891 क्रमांकाच्या एचएफ डिलक्स दुचाकींची भीषण धडक होऊन तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही थरकापजनक घटना आज संध्याकाळी चिखली तालुक्यातील रस्त्यावर घडली.
सुपर स्प्लेंडरवर असलेले 18 वर्षीय शेख रेहान शेख रहेमान (रा. भोरसा भोरसी) व सुमित खंडागळे (रा. राऊतवाडी, चिखली) हे दोघे जबर धडक झाल्यामुळे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दुचाकीवर असलेला रामा रामेश देशमुख (वय 23, रा. तांबूळवाडी) हाही अपघातात गंभीर जखमी झाला आहे. तिघांनाही तातडीने उपचारासाठी जवंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे दाखल करण्यात आले आहे.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी वेग आणि निष्काळजीपणाचं संभाव्य कारण मानलं जात आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरू केला असून अधिक तपास सुरू आहे.