spot_img
spot_img

राजूर घाटात शॉकिंग अपघात! राठोडांचा मृत्यू, गंभीर जखमींचा जीव टांगणीला

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्याकडे जाणाऱ्या राजूर घाटात आज सकाळी भीषण अपघात घडला असून, यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मारूती ईको गाडीतील दोघे गंभीर जखमी झाले आहेत! हानुमान मंदिराजवळील वळणावर भरधाव ईको गाडीने दुचाकीला जबर धडक दिली आणि दुचाकी थेट गाडीखाली चिरडली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रतीलाल राठोड (रा. मोहेगाव) हे बुलढाण्याकडे कामानिमित्त येत असताना हा अपघात घडला. सकाळी अंदाजे 11 वाजता राजूर घाटातील धोकादायक वळणावर मारूती ईको (क्र. MH 37 AH 3099) गाडीने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. धडकेनंतर दुचाकी गाडीखाली चिरडली गेली आणि राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रसंग इतका भीषण होता की काही काळ घाटात वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान, ईको गाडीत असलेले शिव प्रसाद व निकिता प्रसाद (दोघे रा. बुलढाणा) हे देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीसाठी पुढे सरसावले. बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला असून, अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!