spot_img
spot_img

‘रोटीरोजी’च्या प्रश्नासाठी भाजपा सरसावली! – अतिक्रमणधारकांसाठी गाळे उपलब्ध करा : मंदार बाहेकर यांची मागणी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भाजपा शहराध्यक्ष पदाचा प्रभार घेतल्या पासून बुलढाणा शहरातील अतिक्रमणधारक व नव व्यवसायिकांसाठी गाळे उपलब्धते संदर्भात पहिले निवेदन मंदार बाहेकर यांनी आज नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

सन 2014-15 पासून व त्यानंतरच्याही काळात बरेच वेळा बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा असणारे अतिक्रमण काढण्यात आले व पुढील न्याय देण्याच्या संदर्भाने अतिक्रमण धारकांची रीतसर नोंदणी करण्यात आली. नगरपरिषद बुलढाणा यांच्या माध्यमातून काही व्यवसायीक गाळे त्यांच्यासाठी बांधण्यात आली होती. यामध्ये अतिक्रमणधारक संख्या व बांधलेली व वितरीत गाळे यामध्ये बरीच तफावत होती. यानंतरच्या काळात जी बांधकाम झाली, त्यामध्ये जी गाळे देण्यात आली व सद्यस्थितीत जी बांधकामे चालू आहे त्यामध्ये किती गाळे अतिक्रमण धारकांना आहेत.
व त्या व्यतिरिक्त नगर परिषदेचे उत्पन्न वाढायच्या हिशोबाने काही गाळे खुल्या हर्राशी मध्ये उपलब्ध करून देण्यात आली, ती किती आहेत? येणाऱ्या काळात पूर्ण होणाऱ्या गाळ्यांमध्ये नोंदणीकृत अतिक्रमणधारक व नव व्यवसायिकांना त्यामध्ये गाळे उपलब्ध व्हावे
या संदर्भातील धोरणाची माहिती मिळावी यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी बुलढाणा भाजपा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, कामगार आघाडी राज्य सचिव विश्रामजी पवार, बुलढाणा नगरपरिषद मा.गटनेते अरविंद होंडे, शहर भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीपजी सोनटक्के, युवा पदाधिकारी स्फूर्तीदीप ठाकरे, करण बेंडवाल, निलेश गायकवाड, नितीन नरवाडे, विजय मखरे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!