लोणार (हॅलो बुलढाणा/संदीप पाटील ) गेल्या पंचवीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माजी सरपंचाचा कूजलेला मृतदेह काल रात्री उशीरा आढळून आल्याने लोणार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.काही ग्रामस्थांनी हा खून असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली.लोणार तहसीलमध्ये काल 10 जून रोजी खळबळजनक बातमी समोर आली. माजी सरपंच अशोक आबाजी सोनुने (60) रा. वाढव, लोणार असे मृतकाचे नाव आहे. त्यांचा
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत लोणार शहरातील हिरडाव रोडवर आढळला. अशोक सोनुने हे वाढव गावाचे माजी सरपंच होते आणि १४ मे पासून बेपत्ता होते. लोणार पोलीस ठाण्यात अशोक सोनुने यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल संध्याकाळी शहरातील हिरडाव रोडवर त्यांचा कुजलेला आणि दुर्गंधीयुक्त मृतदेह आढळूनआल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी पोहोचले. सूत्रांनी सांगितले की, मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. काही लोकांना हा खून असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.










