spot_img
spot_img

चिखलीचा झेंडा गडचिरोलीत फडकला! शत्रूच्या अड्ड्यावर घुसलाच ‘राहुल’ अन मग…

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) माओवाद्यांच्या विरुद्ध मोठी कारवाई करून पोलीस दलाच्या शौर्याची उज्ज्वल छबी निर्माण करणाऱ्या चिखलीच्या सुपुत्राचा गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देव्हडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. हे केवळ त्यांचे नव्हे, तर चिखली तालुक्याचेही भूषण आहे.दि. 20 मे 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील मौजा-बिनागुंडा जंगल परिसरात विशेष पथकाने राबवलेल्या धाडसी ऑपरेशनमध्ये 5 जहाल माओवादी अटकेत घेण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, नक्षली साहित्य जप्त झाले. विशेष म्हणजे, या मोहिमेचे नेतृत्व स्वतः राहुल देव्हडे यांनी केले आणि प्राणाची पर्वा न करता माओवाद्यांच्या अड्ड्यावर तडाखेबंद कारवाई केली.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या शौर्याची दखल घेत, विशेष प्रशस्तिपत्र देत गौरव केला. फडणवीस म्हणाले, “राहुल देव्हडे यांचे धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा महाराष्ट्र पोलीस दलाचा अभिमान आहे. त्यांच्या कामगिरीने माओवाद्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.”

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!