spot_img
spot_img

💥दुर्दैवी! जीआरपी विकी मुख्यदल यांचा मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू – जुमडा गावावर शोककळा!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील जुमडा येथील रहिवासी व मुंबई ठाणे पोलीस विभागात जीआरपीमध्ये कार्यरत असलेले विकी बाबासाहेब मुख्यदल यांचे नऊ जून रोजी सकाळी मुंबई येथे लोकल ट्रेनने प्रवास करत असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान पुष्पक एक्सप्रेस व लोकल ट्रेनचा अपघात झाला. या अपघातात विकी मुख्यदल यांचे निधन झाले आहे.

विकी मुख्यदल यांच्या मृत्यूची वार्ता गावात समजताच सर्वत्र शोककळा पसरलीय. विकी मुख्यदल यांचा जन्म 5 जून 1992 रोजी झाला असून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई ठाणे जीआरपी पोलीस विभागात नोकरी मिळाली. तर 5 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. त्यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे. 9 जून रोजी ते सकाळी कर्तव्यावर जात असताना मुंब्रा दरम्यान लोकल ट्रेन चा विरुद्ध दिशेने जात असताना गाडीच्या दरवाजामध्ये उभे असलेले प्रवासी हे अचानक एका वळणावर एकमेकावर आदळले. यामध्ये सहा प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले आहे. यामध्ये जीआरपी जवान विकी मुख्यदल यांचा समावेश होता. विकी मुख्यदल यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन भाऊ एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!