बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नंदुरबार येथील एका चालकाच्या संगनमताने सूर्यफूलचा ट्रक घशात घालून त्याची इतरत्र विल्हेवाट लावणाऱ्या बुलढाण्यातील प्रतिष्ठित उद्योजक (दोन जैस्वाल) यांनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी नंदुरबार पोलिसांनी त्यांना बुलढाण्यातून उचलले असून, दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरण 2023 मधील आहे. मात्र सदर कारवाई ही नुकतीच करण्यात आली.नंदुरबार येथील एका व्यापाऱ्याने सूर्यफूलाने भरलेला ट्रक दुसऱ्या व्यापाराकडे ट्रक चालकाला नेण्यास सांगितले होते.मात्र ट्रकचालक बुलढाण्यात एका लॉजला मुक्कामी थांबला होता. दरम्यान ट्रक चालक व बुलढाण्यातील 2 प्रतिष्ठित व्यापारी (दोन्हीही जयस्वाल) यांचे संगणमत झाले आणि ट्रक चालकाने संपूर्ण माल निम्म्या किमतीत जयस्वाल यांना दिला.जयस्वाल यांनी या मालाची इतरत्र विल्हेवाट लावून आपला खिसा भरला होता.सूर्यफुलाचा मूळ मालकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यावर ट्रकचालक नंदुरबार पोलिसांच्या हाती सापडला. चौकशीत बुलढाण्यातील दोन व्यापारी यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने नंदुरबार पोलिसांनी दोघा जैस्वालांना बुलढाण्यातून अटक केली आहे.या दोन्ही जयस्वालांवर कलम 420 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(क्रमश:)