बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जवळपास दोन वर्षापासून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक नव्हते. त्यामुळे या पदाचा पदभार डॉ.भागवत भुसारी यांनी प्रभारी म्हणून पाहिला.परंतू आता मात्र लातूरचे डॉ. दत्तात्रय बिराजदार बुलढाण्याचा पदभार सांभाळणार आहेत. डॉ. बिराजदार यांच्या विनंतीवरून त्यांना सदर पदस्थापना देण्याचा आदेश आरोग्य विभागाकडून धडकला आहे.गेल्या दोन वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कार्यभार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी योग्यरीत्या सांभाळला.आता मात्र लातूर जिल्ह्यातील बागळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकडॉ. दत्तात्रय बिराजदार यांची येथे पदस्थापना झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीत रुग्णसेवा अधिक चांगली व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.